महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक सावरण्यास सुरुवात ; सकाळच्या सत्रात ३०० अशांची झाली होती घसरण - BSE Sensex

वेदांत, एचसीएल टेक, टीसीएस, भारती एअरटेल, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टेकएम, एसबीआय, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर २.६३ टक्क्यापर्यंत घसरले आहेत

शेअर बाजार

By

Published : Aug 16, 2019, 1:09 PM IST

मुंबई - शेअर बाजार सकाळच्या सत्रात ३०० अंशाने घसला. धातू, ऑटो, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरच्या घसरणीचा हा परिणाम झाला होता. त्यानंतर शेअर बाजार ४७.११ अंशाने वधारून ३७,२६४.४१ वर पोहोचला.

निफ्टीचा निर्देशांक हा १४.९५ अंशाने वधारून ११,०१४.९५ वर पोहोचला आहे.
या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले
सकाळच्या सत्रात वेदांत, एचसीएल टेक, टीसीएस, भारती एअरटेल, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टेकएम, एसबीआय, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर २.६३ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. येस बँक, ओएनजीसी, आयटीसी, बजाज फायनान्स आणि एचयूएलचे शेअर १.३७ टक्क्यांनी वधारले आहेत.

बुधवारी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून १ हजार ६१४.६३ कोटींच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १ हजार ६१९.८२ कोटींच्या शेअरची खरेदी केली. स्वातंत्र्य दिन असल्याने गुरुवारी शेअर बाजार बंद होता.

ABOUT THE AUTHOR

...view details