मुंबई - आठवडाभर पडझड सुरू असताना शेअर बाजाराचा निर्देशांक १०० अंशाने वधारून आज सावरला आहे. यामध्ये ऑटो, आयटी आणि वित्तीय कंपन्यांचे शेअर सुधारले आहेत. अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवर नवे आयात कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.
शेअर बाजार निर्देशांक ९९.९० अंशाने वधारून ३७,११८.२२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १७.३५ अंशाने वधारून १०,९९७.३५ वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
एचडीएफसीचा तिमाहीमध्ये ४६ टक्क्यांनी फायदा झाला आहे. त्यामुळे एचडीएफसीचे शेअर १.७५ टक्क्यांनी वधारले आहेत. यामध्ये भारती एअरटेल, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, मारुती, एम अँड एम, टेक महिंद्रा, हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांचे शेअर हे ६.०२ टक्क्यांनी वधारले आहेत. याचबरोबर टीसीएस, एल अँड टी आणि टाटा मोटर्सचे शेअर वधारले आहेत. एसबीआय, टाटा स्टील, एनटीपीसी, ओएनजीसी, पॉवप ग्रीड, वेदांत, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसीचे शेअर २.७६ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.