मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १०३०.२८ अंशांहून अधिक वधारला. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर २७४.२० अंशाने वधारला. निफ्टीच्या कामकाजात तांत्रिक अडचणींमुळे अडथळा आला होता.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १०३०.२८ अंशाने वधारून ५०,७८१.६९ वर स्थिरावला. एचडीएफसी बँकेचे शेअर सर्वाधिक सुमारे ३ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, एसबीआय, अॅक्सिस बँक, एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले आहेत. तर टीसीएस, डॉ. रेड्डीज, एनटीपीसी, सन फार्मा आणि बजाज ऑटोचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आयटी हार्डवेअरच्या उत्पादनाकरता पीएलआय योजनेला मंजुरी