मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात ४०० अंशाने वधारला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक १२१.८० अंशाने वधारला आहे. एचडीएफसी ट्विन्स, आयसीआयसीआय बँक, टीसीएसचे वधारलेले शेअर आणि जागतिक बाजारातील स्थितीमुळे शेअर बाजारात तेजी आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात ४१६.४४ अंशाने वधारून ४०,१७४.०२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १२१.८० अंशाने वधारून ११,७९०.९५ वर पोहोचला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
आयसीआयसीआय बँकेचे सर्वाधिक सुमारे ४ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ एसबीआय, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, टाटा स्टील आणि एचडीएफसीचे शेअर वधारले. भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर घसरले.
शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता-
मागील सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक १४३.५१ अंशाने वधारून ३९,७५७.५८ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २६.७५ अंशाने वधारून ११,६६९.१५ वर स्थिरावला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी ७४०.६१ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक या पार्श्वभूमीवर शेअर बाजार अस्थिर राहणार असल्याचा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर प्रति बॅरल ०.०८ टक्क्यांनी वधारून ३९ डॉलर आहे.