मुंबई-शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ३०० अंशाने वधारला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसचे शेअर वधारले. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थिती आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या निधीचा ओघ या कारणांनी शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.
शेअर बाजाराने ४४,२७१.१५ हा निर्देशांक गाठून आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक नोंदविला आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ३०९.३६ अंशाने वधारून ४४,१९१.६१ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ८३.८५ अंशाने वधारून १२,९४२.९० वर पोहोचला.
हेही वाचा-आर्थिक दिवाळखोरीतील लवासाचा नवीन मालक कोण? सोमवारी निविदेवर निर्णय होण्याची शक्यता
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
इंडसइंड बँकेचे सर्वाधिक ५ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, एनटीपीसी आणि टाटा स्टीलचे शेअर वधारले. एचडीएफसी, एशियन पेंट्स, आयटीसी आणि भारती एअरटेलचे शेअर घसरले.
हेही वाचा-'आर्थिकबरोबरच उर्जेमध्ये महाशक्ती होण्याचे ध्येय भारताला गाठावे लागेल'
विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक २८२.२९ अंशाने वधारून ४३,८८२.२५ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ८७.३५ अंशाने वधारून १२,८५९.०५ वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारात शुक्रवारी ३,८६०.७८ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे देशातील बाजाराची स्थिती चांगली राहिल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख बिनोद मोदी यांनी सांगितले.
मोठ्या कंपन्यांना बँकिंग परवाने देण्याबाबात आरबीआयच्या अंतर्गत समितीने शिफारस केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठ्या उद्योगांचे शेअर वधारले आहेत. जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर ०.४० टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ४५.२५ डॉलर आहेत.