महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार ९९६ अंशांनी वधारून स्थिरावला; हे 'आहे' कारण - Share Market today news

मुंबई शेअर बाजार निर्देशांक ९९५.९२ अंशांनी वधारून ३१,६०५.२२वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २८५.९० अंशांनी वधारून ९,३१४.९५वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : May 27, 2020, 5:13 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ९९६ अंशांनी बुधवारी वधारला आहे. बँकिंग आणि आयटी कंपन्यांचे शेअर वधारले आहे. डेरिटिव्हज (भविष्यातील शेअर) सौद्यांची मुदत संपणार असल्याने हे शेअर वधारल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक ९९५.९२ अंशांनी वधारून ३१,६०५.२२वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २८५.९० अंशांनी वधारून ९,३१४.९५वर स्थिरावला.

हेही वाचा-कोरोना उपचारावर 'हे' वैद्यकीय उपकरण वापरण्यास केंद्र सरकारची मंजुरी

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-

अ‌ॅक्सिस बँकेचे सर्वाधिक १३ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडुसइंड बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर वधारले आहेत. तर सन फार्मा, अल्ट्राटेक सिंमेट, टायटन आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-आरोग्य सेतू अॅपच्या सुरक्षिततेमधील त्रुटी शोधा; मिळवा १ लाख रुपये!

जागतिक बाजारात सकारात्मक स्थिती असल्याने भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा निधी वाढला आहे. तर देशातील गुंतवणूकदारही उत्साहित झाले आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मंगळवारी ४ हजार ७१६.१३ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ५ पैशांनी घसरला आहे. त्यामुळे एका डॉलरसाठी ७५ रुपये ७१ पैसे मोजावे लागणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details