महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजारात ५९३ अंशांनी तेजी; 'या' कंपन्यांचे वधारले शेअर

मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. असे असले तरी एचयूएल, इन्फोसिस आणि नेस्लेचे शेअर घसरले आहेत.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Sep 28, 2020, 6:34 PM IST

मुंबई - मुंबई शेअर बाजार निर्देशांक ५९३ अंशांनी वधारला आहे. वित्तीय आणि वाहन कंपन्यांचे शेअर वधारल्याने मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५९२.९७ अंशांनी वधारून ३७,९८१.६३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १७७.३० अंशांनी वधारून ११,२२७.५५ वर पोहोचला.

इंडसइंड बँकेचे शेअर सर्वाधिक ८ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, पॉवरग्रीड, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा आणि एम अँड एमचे शेअर वधारले आहेत. एचयूएल, इन्फोसिस आणि नेस्लेचे शेअर घसरले आहेत.

एलकेपी सिक्युरिटीजचे मुख्य संशोधक एस. रंगनाथन म्हणाले, की वाहन, औषधी आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरमुळे बाजारात तेजी निर्माण झाली. जागतिक गुंतवणूकदारांचे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. निवडणुकीनंतर अमेरिकेच्या बदललेल्या धोरणामुळे जगभरात शेअरच्या किमतीवर परिणाम होईल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details