महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 9, 2021, 4:22 PM IST

ETV Bharat / business

शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५८४ अंशाने वधारला; खासगी बँकांचे शेअर तेजीत

मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर वधारला आहे. मुंबई शेअर बाजारात कोटक बँकेचे सर्वाधिक ३ टक्क्यापर्यंत शेअर वधारले आहेत.

share market news
शेअर बाजार न्यूज

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५८४.४१ अंशाने वधारून ५१,०२५.४८ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १४२.२० अंशाने वधारून १५,०९८.४० वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर वधारला आहे. मुंबई शेअर बाजारात कोटक बँकेचे सर्वाधिक ३ टक्क्यापर्यंत शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ एचडीएफसी ट्विन्स, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स आणि टीसीएसचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे पॉवरग्रीड, ओएनजीसी, एनटीपीसी आणि डॉ. रेड्डीजचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलर; देशात इंधनाचे दर 'जैसे थे'

रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतीज्ज्ञ विनोद मोदी यांच्या माहितीनुसार जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीने शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.७२ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६८.७३ टक्क्य्यांवर पोहोचले आहेत.

हेही वाचा-कच्च्या तेलाचे दर कमी करण्याच्या भारताच्या मागणीवर सौदीने 'हा' दिला सल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details