महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 26, 2021, 6:37 PM IST

ETV Bharat / business

दिवसाखेर शेअर बाजाराचा ५६८ अंशाने वधारला निर्देशांक

शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५६८.३८ अंशाने वधारून ४९,००८.५० वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १८२.४० अंशाने वधारून १४,५०७.३० वर स्थिरावला.

Share Market
शेअर बाजार

मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५६८ अंशाने वधारला. तर निफ्टीने पुन्हा १४,५०० चा टप्पा गाठला आहे. एचडीएफसी ट्विन्स, एचयूएल आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.

शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५६८.३८ अंशाने वधारून ४९,००८.५० वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १८२.४० अंशाने वधारून १४,५०७.३० वर स्थिरावला.

हेही वाचा-सायरस मिस्त्रींबरोबरील वादात 'सर्वोच्च' विजय; रतन टाटांनी ही' दिली प्रतिक्रिया

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

बजाज फायनान्सचे सर्वाधिक ४ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले होते. त्यापाठोपाठ टायटन, एशियन पेंट्स, एचयूएल, भारती एअरटेल, बजाज ऑटो आणि नेस्ले इंडियाचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, आयटीसी आणि मारुतीचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-टाटा -सायरस मिस्त्री वाद; सर्वोच्च न्यायालयाकडून एनसीएलएटीचे आदेश रद्द

बाजार विश्लेषकांच्या माहितीनुसार जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. जागतिक बाजारात कच्च्य तेलाचे दर २.०५ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६३.२२ डॉलर आहेत.

बुधावरी आणि गुरुवारी शेअर बाजारात मोठी पडझड

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी दिवसाखेर ७४०.१९ अंशाने घसरून ४८,४४०.१२ वर स्थिरावला. तर बुधवारी आणि गुरुवारी या दिवसांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,६११.३२ अंशाने घसरला आहे. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ७,००,५९१.४७ कोटी रुपयांवरून १,९८,७५,४७०.४३ कोटी रुपये झाले होते. तर गुंतवणुकदारांनी सात लाख कोटी रुपये गमाविले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details