मुंबई- शेअर बाजार निर्देशांक ५२९.३६ अंशाने वधारून ४६,९७३.५४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १४८.१५ अंशाने वधारून १३,७४९.२५ वर स्थिरावला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी ट्विन्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत.
अॅक्सिस बँकेचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. त्यापाठोपाठ सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि भारती एअरटेलचे शेअर वधारले आहेत. दुसरीकडे इन्फोसिस, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया आणि टेक महिंद्राचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-शक्तीकांत दास यांची बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी कर्जाच्या व्याजदराबाबत चर्चा