मुंबई- शेअर बाजार निर्देशांक सलग पाचव्या सत्रात ४५३ अंशाने वधारून ३९,०५२.०६ वर स्थिरावला. इंग्लंड आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भात आज करार झाला आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचा मुंबई शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आणखी आर्थिक सुधारणा जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. यामुळे देशातील गुंतवणूकदार उत्साहित झाले आहेत.