महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ऐतिहासिक! शेअर बाजाराने ओलांडला ४५,००० चा टप्पा... - शेअर बाजार निर्देशांक न्यूज

मुंबई शेअर बाजाराने ४५,१४८.१८ चा टप्पा गाठला. त्यानंतर दिवसाखेर शेअर बाजार निर्देशांक ४४६.९० अंशाने वधारून ४५,०७९.५५ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशाक १३,२८०.०५ या नव्या उच्चांकावर पोहोचला. दिवसाखेर निफ्टीचा निर्देशांक १२४.६५ अंशाने वधारून १३,२५८.५५ वर स्थिरावला.

शेअर बाजार
शेअर बाजार

By

Published : Dec 4, 2020, 5:33 PM IST

मुंबई- आरबीआयने रेपो दर 'जैसे थे' ठेवल्यानंतर शेअर बाजाराने ४५,००० चा टप्पा आज पहिल्यांदाच ओलांडला आहे. वित्तीय कंपन्यांच्या शेअरची आज जोरदार खरेदी झाली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दर सलग तिसऱ्यांदा स्थिर ठेवल्याचे जाहीर केले. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराने ४५,१४८.१८ चा टप्पा गाठला. त्यानंतर दिवसाखेर शेअर बाजार निर्देशांक ४४६.९० अंशाने वधारून ४५,०७९.५५ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशाक १३,२८०.०५ या नव्या उच्चांकावर पोहोचला. दिवसाखेर निफ्टीचा निर्देशांक १२४.६५ अंशाने वधारून १३,२५८.५५ वर स्थिरावला.

हेही वाचा-'डिजीटल बँकिंगवरील ग्राहकांचा विश्वास टिकविणे गरजेचे असल्याने एचडीएफसी बँकेवर कारवाई'

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

रेपो दराबाबत संवदेनशील असलेले बँकिंग, वित्तीय, स्थावर मालमत्ता व वाहन कंपन्यांचे शेअर वधारले. आयसीआयसीआय बँकेचे सर्वाधिक ४ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्म, भारती एअरटेल, एचयूएल, एसबीआय, एल अँड टी, अक्सिस बँक आणि इंडसइंड बँकेचे शेअर वधारले. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिन्सर्व्ह, एचसीएल टेक आणि एचडीएफसीचे शेअर घसरले.

हेही वाचा-देशांतर्गत ८० टक्के विमान वाहतूक सेवा देण्याची कंपन्यांना केंद्राकडून परवानगी

तिसऱ्यांदा रेपो दर कायम-

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज संपली. यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली. यामध्ये त्यांनी रेपो दर हे पूर्वीप्रमाणेच चार टक्क्यांवर कायम ठेवले असल्याचे जाहीर केले. यासोबतच, रिवर्स रेपो दरही ३.३५ टक्के एवढाच कायम ठेवण्यात आला आहे. रेपो दर कायम ठेवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details