मुंबई - आयसीआयसीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी आणि मारुतीच्या उपलब्धकालीन शेअरची (फ्युचर अँड ऑप्शन) सप्टेंबरमधील मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीसह जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजार निर्देशांक ३९६ अंशाने वधारला आहे. बँकिंग व ऑटो कंपन्यांचे शेअर वधारल्याचे दिसून आले.
शेअर बाजार निर्देशांक ३९६.२२ अंशाने वाढून ३८,९८९.७४ वर पोहोचला, तर निफ्टीचा निर्देशांक हा १३३.१० अंशाने वधारून ११,५७३.३० वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
वेदांत, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, ओएनजीसी, मारुती, इंडसइंड बँक, एल अँड टी, हिरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स आणि कोटक बँकेचे शेअर ६.४७ टक्क्यांनी वधारले, तर येस बँक, इन्फोसिस, एचयूएल, एचसीएल टेक, एचडीएफसी, एनटीपीसी, पॉवरग्रीड आणि टीसीएसचे शेअर ४.९३ टक्क्यांनी घसरले.
हेही वाचा-पीएमसीच्या खातेदारांना दिलासा; खात्यामधून १० हजार रुपयापर्यंत काढता येणार रक्कम