मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ३७७.६० अंशाने वधारून ४०,५२२ वर स्थिरावला. कोटक महिंद्राच्या बँकेचे शेअर १२ टक्क्यांनी वधारले. त्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला.
निफ्टीचा निर्देशांक १२१.६५ अंशाने वधारून ११,८८९.४० वर स्थिरावला. कोटक महिंद्रा बँकेने जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत एकूण २ हजार ९४७ कोटींचा नफा मिळविला आहे. त्याचा परिणाम म्हणून कोटक महिंद्रा बँकेचे शेअर १२ टक्क्यांनी वधारले. एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माहितीनुसार कोटक बँकेने चांगला नफा मिळविला आहे. कोटक महिंद्रा बँकेकडे चांगल्या गुणवत्तेची मालमत्ता आहे.