महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाच्या लसीला मान्यता मिळाल्याने शेअर बाजाराचा मोठा 'डोस' - निफ्टी निर्देशांक न्यूज

मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा निर्देशांक आज सलग नवव्या सत्रात वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ३०७.८२ अंशाने वधारून ४८,१७६.८० वर स्थिरावला.

शेअर मार्केट
शेअर मार्केट

By

Published : Jan 4, 2021, 5:22 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने ऑक्सफोर्डसह बायोटेकच्या लसीला परवानगी दिल्याने शेअर बाजाराने आज नवा उच्चांक नोंदविला आहे. टीसीएस, इन्फोसिस या आयटी कंपन्यांचे शेअर वधारले.

मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा निर्देशांक आज सलग नवव्या सत्रात वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ३०७.८२ अंशाने वधारून ४८,१७६.८० वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४८,२२०.४७ या उच्चांकावर दिवसभरात पोहोचला होता. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर ११४.४० अंशाने वधारून १४,१३२.९० वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक दिवसभरात १४,१४७.९५ या उच्चांकावर पोहोचला होता.

हेही वाचा-घरातून काम करण्याला कायदेशीर समर्थन मिळण्याची शक्यता

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

ओएनजीसीचे सर्वाधिक ४ टक्क्यापर्यंत शेअर वधारले. त्यापाठोपाठ टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एम अँड एम, एचयूएल आणि एल अँड टीची शेअर वधारले. कोटक बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टायटन आणि पॉवरग्रीडचे शेअर घसरले.

हेही वाचा-पिण्याच्या बॉटलवर माहिती देण्याकरता सरकारकडून कंपन्यांना मुदतवाढ

कोरोनाच्या लसीमुळे शेअर बाजारात उत्साह

कोरोना लसीच्या वापराला सरकारकडून मंजुरी मिळाल्याने शेअर बाजारात उत्साह आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीजीआयसी) ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली अॅस्ट्राझेनेका लसीला रविवारी मंजुरी दिली. त्याचबरोबर भारत बायोटेकने तयार केलेल्या स्वदेशी लसीलाही (डीजीआयसी) मंजुरी दिली आहे. असे असले तरीही या लसीची मंजुरी केवळ आपत्कालीन स्थिती असल्याने देण्यात आली आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे (कच्च्या तेलाचे) सौद्यातील दर प्रति बॅरल १.३१ टक्क्यांनी वाढून ५२.४८ डॉलर आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details