मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ४०० अंशांनी वधारला. जागतिक आर्थिक मंचावर सकारात्मक स्थिती आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले आहेत.
शेअर बाजार निर्देशांक ३०० अंशांनी वधारला; निफ्टी पोहोचला १२,१५० वर - sensex Mumbai today
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३३४ अंशांनी वधारून ४१,३१३ वर पोहोचला, तर आयटीसी कंपनीचे शेअर ३ टक्क्यापर्यंत, टाटा स्टील, अल्ट्रा टेक सिमेंट आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर १ टक्क्यांपर्यंत वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३३४ अंशांनी वधारून ४१,३१३ वर पोहोचला, तर आयटीसी कंपनीचे शेअर ३ टक्क्यापर्यंत, टाटा स्टील, अल्ट्रा टेक सिमेंट आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर १ टक्क्यांपर्यंत वधारले आहेत.
निफ्टीचा निर्देशांक १०५ अंशांनी वधारून १२,१५० वर पोहोचला. निफ्टीमधील सर्व क्षेत्रांचा निर्देशांक वधारला आहे. निफ्टी मेटलचा निर्देशांक सर्वाधिक १.४ टक्क्यापर्यंत वधारला. भेल आणि आयडीबीआय बँकेसह २९५ कंपन्या आज डिसेंबरच्या तिमाहीपर्यंतच्या वित्तीय कामगिरी जाहीर करणार आहेत. कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. असे असले तरी जागतिक शेअर बाजाराप्रमाणे देशातील शेअर बाजार वधारलेले आहेत.