महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात ३५० अंशाने घसरण; 'हे' आहे कारण

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३६५.१९ अंशाने घसरून ३९,५५७.२७ वर होता. तर निफ्टीचा निर्देशांक १०६.९० अंशाने घसरून ११,६२२.७० वर होता.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : Oct 29, 2020, 12:11 PM IST

मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात ३५० अंशाने घसरला आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थिती, कोरोना विषाणुचा जगभरात वाढता संसर्ग आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अस्थिरता या कारणांनी शेअर बाजारात घसण झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३६५.१९ अंशाने घसरून ३९,५५७.२७ वर होता. तर निफ्टीचा निर्देशांक १०६.९० अंशाने घसरून ११,६२२.७० वर होता.

या कंपन्यांचे घसरले-वधारले निर्देशांक

टायटनचे शेअर सुमारे ४ टक्क्यांनी घसरले. त्यापाठोपाठ एल अँड टी, ओएनजीसी, टेक महिंद्रा, बजाज ऑटो, एचयूएल आणि नेस्ले इंडियाचे शेअर घसरले. अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचसीएल टेकचे शेअर वधारले आहेत.

अशी होती मागील सत्रात स्थिती-

मागील सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५९९.६४ अंशाने घसरून ३९,९२२.४६ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १५९.८० अंशाने घसरून ११,७२९.६० वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) बुधवारी १ हजार १३०.९८ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.

ही आहे शेअर बाजार निर्देशांकाच्या घसरणीचे कारणे-

युरोपसह अमेरिकेत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी जर्मनी आणि फ्रान्सने नव्याने टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या विश्वासाला तडा गेला आहे. डेरिटिव्हजचे करारांची (कॉन्ट्रॅक्ट) मुदत संपत असल्याने शेअर बाजारात सहभाग घेणाऱ्यांना सावध पवित्रा घेतला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सहा दिवसानंतर होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संदिग्धता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ०.१३ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ३९.५९ डॉलर झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details