मुंबई – शेअर बाजार खुला होताना निर्देशांक 600 अंशांनी वधारला. आशियातील शेअर बाजारात सकारात्मक स्थिती आहे, तर अमेरिकेसह युरोपमधील शेअर बाजार निर्देशांकही वधारल्याने देशातील शेअर बाजारातही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह बँकेने कॉर्पोरेट बाँड खरेदीची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे देशातील भांडवली बाजारात चलनाची तरलता वाढणार असल्याची गुंतवणूकदारांना आशा आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट जगातयेणार असल्याची शेअर बाजाराची भीतीही कमी झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी सव्वा दहा वाजता 609 अंशांनी वधारून 33,837 वर पोहोचला, तर निफ्टीचा निर्देशांक 159 अंशांनी वधारून 9,972 वर पोहोचला.