मुंबई- शेअर बाजार खुला होताना निर्देशांक २५० अंशांनी वधारला आहे. बँकिंग, उर्जा आणि आयटी कंपन्यांचे शेअर तेजीत आल्याने मुंबई शेअर बाजार वधारला आहे.
निफ्टीचा निर्देशांक ३०.४० अंशांनी वधारून ९,२१७.७० वर पोहोचला आहे. ओएनजीसीचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. त्यापाठोपाठ टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, टीसीएस आणि एल अँड टीचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे टायटन, एम अँड एम, मारुती, पॉवरग्रीड, टेक महिंद्रा आणि एचडीएफसी बँकेचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-व्हॉट्सअॅपची झुमला टक्कर; 'हे' आहे फीचर्स
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार ७४२.८४ अंशांनी वधारून ३१,३७९.५५ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक २०५.८५ अंशांनी वधारून ९,१८७.८४ वर स्थिरावला होता.