महाराष्ट्र

maharashtra

मुंबई शेअर बाजारासह निफ्टीच्या निर्देशांकाने नोंदविला 'हा' नवा विक्रम

By

Published : Dec 18, 2019, 12:17 PM IST

किरकोळसह घाऊक बाजारपेठेतील महागाई वाढली आहे. तर राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर चालू वर्षातील पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत घसरेला आहे. अशी प्रतिकूल स्थिती असतानाही शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे. कारण विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारामधील गुंतवणुकीत सातत्य ठेवले आहे

Bombay Stock Exchange
मुंबई शेअर बाजार

मुंबई - शेअर बाजार आणि निफ्टीच्या निर्देशांकाचा आज नवा विक्रम नोंदविला आहे. शेअर बाजार सकाळी १० वाजून १४ वाजता ६३.१२ अंशाने वधारून ४१,४१५.२९ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ९.७५ अंशाने वधारून १२,१७४.७५ वर पोहोचला.

जागतिक मंचावरील सकारात्मक स्थिती आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या निधीत येणाऱ्या ओघामुळे शेअर बाजार वधारला आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये बेकायदशीर पद्धतींचा वापर केल्याप्रकरणी सेबीने पीसी ज्वेलर्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीर पद्धतीमधून पीसी ज्वेलर्सने ८ कोटी रुपये मिळविल्याचा सेबीने पीसी ज्वेर्सवर आरोप ठेवलेला आहे.

हेही वाचा-दिल्ली : घाऊक बाजारपेठेत विक्रमी दर; कांद्याचे दर प्रति किलो २०० रुपयांहून वाढणार

किरकोळसह घाऊक बाजारपेठेतील महागाई वाढली आहे. तर राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर चालू वर्षातील पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत घसरलेला आहे. अशी प्रतिकूल स्थिती असतानाही शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे. कारण विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारामधील गुंतवणुकीत सातत्य ठेवले आहे. तसेच जगभरातील केंद्रीय मध्यवर्ती बँकांना गुंतवणूकदारांना अनुकूल असे व्याजदर निश्चित केले आहेत. यामुळे शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी रस दाखविला आहे.

हेही वाचा-गीता गोपीनाथ यांनी मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता दिला 'हा' सल्ला

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) भांडवली बाजारात १ हजार २४८.४७ कोटी रुपयांची मंगळवारी गुंतवणूक केली आहे. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ९०८.१६ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details