महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजार खुला होताच निर्देशांकाची १०० अंशाची उसळी

शेअर बाजार खुला होताना १०० अंशाने उसळी घेतली. त्यानंतर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला.

संग्रहित - मुंबई शेअर बाजार

By

Published : Nov 13, 2019, 12:19 PM IST

Updated : Nov 13, 2019, 12:36 PM IST

मुंबई - शेअर बाजार खुला होताच निर्देशांकाने १०० अंशाची उसळी घेतली. त्यानंतर शेअर बाजार निर्देशांक १९.९८ अंशाने वधारून ४०,३६५.०६ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ९.४० अंशाने वधारून ११,९२२.८५ वर पोहोचला. अमेरिका-चीनमधील व्यापारी करारावर अनिश्चिततेचे सावट अशा विविध प्रतिकूल कारणांमुळे शेअर बाजार गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ६६४.२० कोटींच्या शेअरची भांडवली बाजारामधून सोमवारी खरेदी केली होती. तर देशातील गुंतवणकूदार संस्थांनी २४५.०६ कोटींच्या शेअरची सोमवारी विक्री केली होती. ही माहिती शेअर बाजाराच्या आकडेवारीतून दिसून आली आहे.

हेही वाचा-'राज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करून 'ई-नाम'चा स्वीकार करावा'

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
येस बँक, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एचयूएल आणि एचडीएफसी बँकेचे शेअर हे २.०५ टक्क्यापर्यंत वधारले.

इन्फोसिस, भारती एअरटेल, एसबीआय, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि आयटीसीचे शेअर हे १.३७ टक्क्यापर्यंत घसरले.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक २१.४७ अंशाने घसरून ४०,३४५.०८ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक हा ५.३० अंशाने घसरून ११,९१३.४५ वर स्थिरावला होता. गुरू नानक जयंती निमित्त भारतीय वित्तीय बाजारपेठ मंगळवारी बंद होती.

सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन ४.३ टक्के घसरल्याने अर्थव्यवस्था मंदावल्याचे चित्र अधिकच गडद झाले आहे. औद्योगिक उत्पादन घटल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढल्याचे व्यापाऱ्याने (ट्रेडर) सांगितले.

Last Updated : Nov 13, 2019, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details