महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजारात सकाळच्या सत्रात चढ-उतार; 'या' कंपन्यांचे वधारले शेअर

एअरटेलचा महसूल दुसऱ्या तिमाहीत २२ टक्क्यांनी वाढून २५ हजार ७८५ कोटी रुपये झाला आहे. तर एकूण ७६३ कोटी रुपयांचा तोटा आहे. त्यामुळे भारती एअरटेलचे शेअर सर्वाधिक सुमारे १० टक्क्यांनी वधारले.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : Oct 28, 2020, 12:05 PM IST

मुंबई - सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीमध्ये निर्देशांक अस्थिर राहिला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात ७५.७५ अंशाने वधारून ४०,५९७.८५ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक २९.९० अंशाने वधारून ११,९१९.३० वर पोहोचला.

एअरटेलचा महसूल दुसऱ्या तिमाहीत २२ टक्क्यांनी वाढून २५ हजार ७८५ कोटी रुपये झाला आहे. तर एकूण ७६३ कोटी रुपयांचा तोटा आहे. त्यामुळे भारती एअरटेलचे शेअर सर्वाधिक सुमारे १० टक्क्यांनी वधारले.

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

एम अँड एम, मारुती, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, अॅक्सिस बँक आणि इन्फोसिसचे शेअर वधारले.कोटक बँकेचे २ टक्क्यांनी शेअर घसरले. एचडीएफसी, एचयुएल, आयसीआयसीआय बँक आणि टायटनचे शेअर घसरले.

मागील सत्रात शेअर बाजार निर्देशांक ३७६.६० अंशाने वधारून ४०,५२२.१० वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १२१.६५ अंशाने वधारून ११,८८९.४० वर स्थिरावला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) मंगळवारी ३,५१४.८९ कोटी रुपयांचे शेअर मंगळवारी खरेदी केले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १.७८ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ४०.८७ वर आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details