हैदराबाद- भारतीय शेअर बाजार येत्या काही दिवसात नवा विक्रम करणार असल्याचा शेअर बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि सणाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी असेल, असाही विश्लेषकांनी अंदाज वर्तविला आहे.
एनव्हिजन कॅपिटल सर्व्हिसेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह म्हणाले, की डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार अमेरिकेचे नवे अध्यक्ष असणार आहेत. या कलाने शेअर बाजारात हालचाली सुरू झाल्या आहेत. शेअर बाजारात सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. मतदानादिवशी शेअर बाजाराची सावध भूमिका होती. कारण, निकाल काय लागणार, याबाबत काहीही माहिती नव्हती. मात्र, जसे मतमोजणी सुरू झाल्यानंतर शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे. गेल्या सर्व पाच सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. या पाच सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक एकूण २,२८० अंशाने वधारला आहे.