मुंबई -कोरोनाच्या संकटातून भारतीय शेअर बाजार सावरत आहे. वित्तीय आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीचा निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक २५३.३३ अंशाने वधारून ३८,९५०.३८ वर पोहोचला.
एनएसई खुली होताना निफ्टीचा निर्देशांक ९३.४५ अंशाने वधारून ११,५१० वर पोहोचला.
या कंपन्यांचे मुंबई शेअर बाजारात वधारले शेअर
इंडसइंड बँक, टीसीएस, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि अॅक्सिस बँकेचे शेअर ५ टक्क्यांपर्यंत वधारले. जागतिक आर्थिक मंचावर सकारात्मक स्थिती असल्याने आशियामधील शेअर बाजारांमध्ये निर्देशांक वधारला.
याकडे शेअर बाजाराचे असणार लक्ष
कॉर्पोरेट कंपन्या लवकरच आर्थिक कामगिरी जाहीर करणार आहेत. त्याकडे शेअर बाजाराचे लक्ष असणार आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक आणि कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण याकडेही शेअर बाजाराचे लक्ष असणार आहे.
मागील सत्रात गुरुवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ६२९ अंशाने वधारला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १६९ अंशाने वधारला होता. आठवडाभरात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,३०८.३९ अंशाने वधारला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक ३६६.७० अंशाने वधारला आहे.