महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजारासह निफ्टीच्या निर्देशांकात किचिंत घसरण - Bombay stock exchange news

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४९.९६ अंशाने घसरून ५२,५१६,७६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १.२५ अंशाने घसरून १५,३१३.४५ वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : Feb 16, 2021, 4:43 PM IST

मुंबई -शेअर बाजार आणि निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर किंचित घसरला आहे. शेअर बाजार गुंतवणुकदारांनी नफा नोंदवून शेअरची विक्री केली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४९.९६ अंशाने घसरून ५२,५१६,७६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १.२५ अंशाने घसरून १५,३१३.४५ वर स्थिरावला.

हेही वाचा-पीएफचे व्याजदर ४ मार्चला जाहीर होण्याची शक्यता

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

अ‌ॅक्सिस बँकेचे शेअर सर्वाधिक सुमारे २ टक्क्यांनी घसरले. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, एसबीआय आणि एचयूएलचे शेअर घसरले. तर दुसरीकडे पॉवरग्रीडचे शेअर ६ टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. ओएनजीसी, एनटीपीसी, कोटक बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले आहेत.

रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ रणनीतीज्ज्ञ विनोद मोदी म्हणाले की, गुंतवणुकदारांनी सार्वजनिक बँका आणि मेटल्सवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, वित्तीय कंपन्या, आयटी आणि एफएमसीजीवर विक्रीचा दबाव राहिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.०९ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६३.२४ डॉलर आहेत.

हेही वाचा-सार्वजनिक बँकांचे खासगीकरण: केंद्र दोन कायद्यांत करणार सुधारणा

ABOUT THE AUTHOR

...view details