मुंबई - शेअर बाजारात वित्तीय कंपन्या, एफएमसीजी आणि ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजार निर्देशांकांत सकाळच्या सत्रात ३४५ अंशाने घसरण झाली आहे.
शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ३४५.५५ अंशाने घसरून ३६,१२७.३८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ९४.३० अंशाने घसरून १०,६४७.०५ वर पोहोचला. आयसीआयसीआय बँक, सिप्ला आणि मारुतीसारख्या महत्त्वाच्या ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. एफएमसीजी, ऑटो, बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची मोठी विक्री झाली. आयसीआयसीआय बँकेचे शेअरची सर्वात अधिक २.६२ टक्के घसरण झाली. त्यानंतर एचडीएफसी बँक, कोटक बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि इंडुसइंड बँकेचे शेअर १.७ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.