महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजाराने नोंदविला विक्रमी निर्देशांक; खनिज तेलाचे दर घसरल्याचा परिणाम - BSE today

कोटक बँकेचे सर्वाधिक १.३५ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, भारती एअरटेल, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एल अँड टी, हिरो मोटोकॉर्प आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले.

Bombay Stock Exchange
मुंबई शेअर बाजार

By

Published : Jan 10, 2020, 12:10 PM IST

मुंबई- शेअर बाजार आणि निफ्टीने आज विक्रमी निर्देशांकाची नोंद केली आहे. मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात १२४.७० अंशाने वधारून ४१,५७७.०५ वर पोहोचला. खनिज तेलाच्या बॅरलचे दर घसरल्याने शेअर बाजाराने विक्रमी निर्देशांकाची नोंद केली आहे.


निफ्टीचा निर्देशांक ३७.२५ अंशाने वधारून १२,२५३.१५ वर पोहोचला. मुंबई शेअर बाजार खुला होताच निर्देशांक ४१,५६८.२० वर पोहोचला. तर गुरुवारी शेअर बाजार बंद होताना ४१,४५२.३५ वर स्थिरावला होता.

हेही वाचा-बीएस-६ इंजिनक्षमतेची वाहने टाटा मोटर्स चालू महिन्यापासून ग्राहकांना देणार

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
कोटक बँकेचे सर्वाधिक १.३५ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, भारती एअरटेल, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एल अँड टी, हिरो मोटोकॉर्प आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले. पॉवरग्रीड, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, इंडुसइंड बँक, एसबीआय आणि नेस्ले इंडियाचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-ईडीचा दणका; मनी लाँड्रिगप्रकरणी एसआरस ग्रुपची २,५१० कोटींची मालमत्ता जप्त

अमेरिका-इराणमधील तणाव निवळला असल्याने जगभरातील गुंतवणूकदारांची चिंता कमी झाली आहे. जागतिक आर्थिक अस्थिरता कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढविल्याचे शेअर बाजर विश्लेषकांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details