महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Share Market on Years First day : नव्या वर्षात पहिल्या दिवशीच शेअर बाजारात उसळी - नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार निर्देशांक

नव्या वर्षाच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी मुंबई शेअर बाजारांमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आणि तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी यांचे दोन्ही निर्देशांक मजबूत झाले. सेन्सेक्समध्ये 900 अंशांची वाढ झाली. तर निफ्टीने 17,600 अंशांचा टप्पा पार केला.

शेअर बाजार अपडेट
शेअर बाजार अपडेट

By

Published : Jan 3, 2022, 7:00 PM IST

मुंबई -नवीन वर्षाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशीच मुंबई शेअर बाजारांमध्ये ( Mumbai share market on 3rd Jan 2021 ) 900 अंशांची उसळी पाहायला मिळाली. यामुळे मुंबई शेअर बाजारात उत्साहाचे आणि तेजीचे वातावरण होते.


नव्या वर्षाच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी मुंबई शेअर बाजारांमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आणि तेजी पाहायला ( Share market today news ) मिळाली. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी यांचे दोन्ही निर्देशांक मजबूत झाले. सेन्सेक्समध्ये 900 अंशांची वाढ झाली. तर निफ्टीने 17,600 अंशांचा टप्पा पार केला. बाजारातील या तेजीमुळे मुंबई स्टॉक एक्सचेंजमधील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य ( BSE listed companies Market capex ) सुमारे 3 लाख 50 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे.

हेही वाचा-Smart Investment Tips : 2022 मध्ये अधिक लाभांश मिळवून देणाकरिता अशी गुंतवणूक करा

निफ्टीतही उल्लेखनीय वाढ -
निफ्टीमध्येही 1.5 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला ( NIFTI on new years first day ) मिळाली. तर बँक आणि वित्तीय निर्देशांक 2.5 टक्क्यांनी वधारला आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या निर्देशांकामध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे. औषध कंपन्या, धातू, स्थावर मालमत्ता आणि एफएमसीजी निर्देशांकामध्येही वाढ पाहायला मिळाली.

हेही वाचा-ATM Service Charges : बँकेच्या एटीएम शुल्कात आजपासून होणार वाढ, जाणून घ्या, सविस्तर


सेन्सेक्सने घेतली 900 अंशांची उसळी
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी घेत ( Bombay stock exchange on new years first day ) 59 हजार 183 अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्येही 272 अंशांची वाढ होऊन 17226 अंशावर बाजार बंद झाला. आज मारुती, विप्रो, पावर ग्रिड, एशियन पेंट, एनटीपीसी व इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअरचा भाव चांगलाच वधारला.

हेही वाचा-Bank Holiday: आजच पूर्ण करा महत्त्वाची बँकिंग काम, जानेवारीत 16 दिवस बंद

ABOUT THE AUTHOR

...view details