महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक २५० अंशाने वधारला; 'या' कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी - Bombay share market latest news

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात २८२.०७ अंशाने वाढून ४३,८८२.०३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ७८.४५ अंशाने वधारून १२,८५०.१५ वर पोहोचला.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : Nov 20, 2020, 11:59 AM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात २५० अंशाने वधारला. एचडीएफसी ट्विन्स, कोटक बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर वधारले. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थिती आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या निधीमधील सातत्य या कारणाने शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात २८२.०७ अंशाने वाढून ४३,८८२.०३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ७८.४५ अंशाने वधारून १२,८५०.१५ वर पोहोचला.

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-

बजाज फिनसर्व्हचे शेअर सर्वाधिक २ टक्क्यांनी वधारले. टाटा स्टील, टायटन, बजाज फायनान्स, एचडीएफसी ट्विन्स आणि कोटक बँकेचे शेअर वधारले. तर आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, अ‌ॅक्सिस बँक, एसबीआय आणि इंडसइंड बँकेचे शेअर घसरले आहेत.

मागील सत्रात मुंबई शेअर बाजार ५८०.०९ अंशाने घसरून ४३,५९९.९६ वर स्थिरावला होता. निफ्टीचा निर्देशांक १.२९ टक्क्यांनी घसरून १२,७७१.७० वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) गुरुवारी १,१८०.६१ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.१४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ४४.२४ डॉलर झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details