मुंबई- मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात २०० अंशाची वाढ होऊन निर्देशांक ३८,४३८ वर पोहोचला आहे. निफ्टीनेही ११ हजार ५०० हजार अंशाचा टप्पा ओलांडला आहे. राजकीय अस्थिरता आणि विदेशी वित्तीय संस्थांची गुंतवणूक मार्चमध्येही सुरू राहिल्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम झाला आहे.
शेअर बाजारात २०० अंशाची वाढ, निफ्टीने ओलांडला ११ हजार ५०० चा टप्पा - FIP
विदेशी वित्तीय संस्थांनी मंगळवारी ९९९.०२ कोटी शेअरची खरेदी केली आहे. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १९६.७० कोटी शेअरची विक्री केली आहे.
![शेअर बाजारात २०० अंशाची वाढ, निफ्टीने ओलांडला ११ हजार ५०० चा टप्पा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2815686-73-822ca8b3-c8ab-4f29-a30e-5fc242dd528a.jpg)
निफ्टीच्या निर्देशांकात ५३ अंशाची वाढ होऊन निर्देशांक ११,५३६ वर पोहोचला. इन्डुसलँड बँक, एसबीआय, सन फार्मा, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, अॅक्सिक बँक आणि टाटा मोटर्सचे शेअर ३.६२ टक्क्यापर्यंत वाढले आहेत. तर ओएनजीसी, एनटीपीसी, पॉवरग्रीड, हिरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लि. या कंपन्यांचे शेअर १.१० टक्क्यापर्यंत घसरले आहेत. विदेशी वित्तीय संस्थांनी मंगळवारी ९९९.०२ कोटी शेअरची खरेदी केली आहे. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १९६.७० कोटी शेअरची विक्री केली आहे.मंगळवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४२४ अंशाची वाढ झाली होती.