महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर सरकारकडून उपायाची शक्यता; शेअर बाजार निर्देशांकांत २०० अंशाने वाढ - आयसीआयसीआय बँक

शेअर बाजार खुला होताच निर्देशांक १२९.०१ अंशाने वधारून ३७,४७९.३४ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक हा ३७.४५ अंशाने वधारून ११,०८५.२५ वर पोहोचला.

शेअर बाजार

By

Published : Aug 19, 2019, 12:11 PM IST

मुंबई - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार पावले उचलण्याच्या तयारीत आहे. त्या अपेक्षेने रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसच्या शेअरची चांगली खरेदी झाली. त्याचाच परिणाम म्हणून सकाळच्या सत्रात निर्देशांक २०० अंशाने वधारला आहे.

शेअर बाजार खुला होताच निर्देशांक १२९.०१ अंशाने वधारून ३७,४७९.३४ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक हा ३७.४५ अंशाने वधारून ११,०८५.२५ वर पोहोचला. शुक्रवारी शेअर बाजार ३८.८० अंशाने वधारून ३७,३५०.३३ वर पोहोचला होता.

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
सन फार्मा, टेकएम, एनटीपीसी, एल अँड टी, एचसीएल टेक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, इन्फोसिस, भारती एअरटेल, आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर हे ३ टक्क्यापर्यंत वधारले.

येस बँक, पॉवरग्रीड, ओएनजीसी, एसबीआय, टाटा स्टील आणि वेदांत स्टीलचे शेअर २.२७ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी १ हजार ३३९.२७ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १ हजार ५८.२८ कोटींच्या शेअरची खरेदी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details