महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

RBI पतधोरण समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी शेअर बाजाराच्या निर्देशांकात २०० अंशाची वाढ - मुंबई शेअर बाजार

शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात २०३.८२ अंशाची वाढ होवून निर्देशांक ३१,९९८.०२ अंशावर पोहोचला. तर निफ्टीच्या निर्देशांकात ४८.३५ अंशाची वाढ होवून ११,९७१.१५ वर पोहोचला.

शेअर बाजार

By

Published : Jun 3, 2019, 12:43 PM IST

मुंबई - आरबीआयच्या पतधोरण समितीची आजपासून तीन दिवसीय बैठक सुरू होत आहे. हे द्विमासिक पतधोरण जाहीर होण्यापूर्वी शेअर बाजाराच्या निर्देशांकात २०० अंशाची वाढ झाली आहे.


शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात २०३.८२ अंशाची वाढ होवून निर्देशांक ३१,९९८.०२ अंशावर पोहोचला. तर निफ्टीच्या निर्देशांकात ४८.३५ अंशाची वाढ होवून निर्देशांक ११,९७१.१५ वर पोहोचला.

या कंपन्यांच्या शेअर वधारले-घसरले

हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, एचयूएल, एचडीएफसी ट्विन्स, पॉवरग्रीड, टीसीएस आणि बजाज फायनान्स कंपन्यांचे शेअर ३ टक्क्यांनी वाढले आहेत. तर ओएनजीसी, येस बँक, टाटा मोटर्स, एसबीआय, एम अँड एम आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर १.७७ टक्क्यापर्यंत घसरले.

आरबीआय रेपो दरात कपात करण्याची शक्यता -
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे गुरुवारी रेपो दर व रिव्हर्स रेपो दर जाहीर करणार आहेत. अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार आरबीआय सलग तिसऱ्यांदा रेपो दरात पाव टक्के कपात करण्याची शक्यता आहे. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीदरम्यानचा जीडीपी गेल्या पाच वर्षात सर्वात कमी राहिल्याची आकेडवारीतून दिसून आले आहे.


शुक्रवारी शेअर बाजार बंद होण्यापूर्वी निर्देशांकात ११७.७७ अंशाची घसरण होवून ३९,७१४ वर पोहोचला होता. तर निफ्टीच्या निर्देशांकात २३.१० अंशाने घसरून ११,९२२.८० वर पोहोचला होता. शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ६७६.१५ कोटींच्या शेअरची खरेदी केली आहे. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ३९४.०९ कोटींच्या शेअरची विक्री केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details