मुंबई - शेअर बाजार निर्देशांक २०० अंशाने वधारला आहे. संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे.
आर्थिक सर्व्हे सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी, २०० अंशाने वधारला निर्देशांक - Share Market today
मुंबई शेअर बाजार निर्देशांक १६८.९१ अंशाने वधारून ४१,०८२.८२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ३९.२५ अंशाने वधारून १२,०७५.१५ वर पोहचला.
Mumbai Share Market
मुंबई शेअर बाजार निर्देशांक १६८.९१ अंशाने वधारून ४१,०८२.८२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ३९.२५ अंशाने वधारून १२,०७५.१५ वर पोहोचला. मागील सत्रात मुंबई शेअर बाजार २८४.८४ अंशाने वधारून ४०,९१३.८२ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ९३.७० अंशाने वधारून १२,०३५.८० वर स्थिरावला होता.
हेही वाचा-अर्थसंकल्पीय अधिवेशन : निर्मला सीतारामन आज सादर करणार आर्थिक सर्वेक्षण