मुंबई -शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात १०० अंशाची वाढ झाली. बँकांच्या शेअरमध्ये वाढ झाल्याने हा परिणाम दिसून आला आहे.
शेअर बाजाराच्या निर्देशांकात १२८.२७ अंशाने वाढ होवून निर्देशांक ३९,५६२.९९ वर पोहोचला. तर निफ्टी २८.७५ अंशाने पोहोचून ११,८७२.८५ वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले
एनटीपीसी, टाटा स्टील, येस बँक, एसबीआय, पॉवर ग्रीड, एल अँड टी, एम अँड एम, आयटीसी, एचडीएफसी बँक, मारुती, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, आयसीआयसी बँक यांचे शेअर ४.५३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. भारती एअरटेल, एशियन पेंट्स, इंडुसलँड बँक, आरआयएल, टाटा मोटर्स, ओएनजीसी आणि सन फार्माचे शेअर १.६३ टक्क्यापर्यंत वधारले.
विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी २ हजार २६.३३ कोटींच्या शेअरची खरेदी केली आहे. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १९५.३५ कोटींच्या शेअरची विक्री केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ११ पैशांनी वधारून ६९.४१ वर पोहोचला आहे.
एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याने शेअर बाजारात उत्साह-
शुक्रवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६२३.३३ अंशाची वाढ होवून निर्देशांक ३९,४३४.७२ वर पोहोचला. तर निफ्टीच्या निर्देशांकात १८७.०५ अंशाची वाढ होवून निर्देशांक ११,८४४.१० वर पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर गुरुवारपासून शेअर बाजारात उत्साह दिसून येत आहे.