मुंबई- शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात सावरला असताना दिवसाखेर पुन्हा घसरला आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ८१० अंशांनी घसरून ३०,५७९ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २३० अंशांनी घसरून ८,९६६ वर स्थिरावला.
गेली काही दिवस पडझड सुरू असताना शेअर बाजारात सकाळच्या सत्रात निर्देशांक ५०० अंशांनी वधारला होता. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर उपाय करण्यासाठी सर्व पर्याय तयार असल्याचे सोमवारी सांगितले.
मुंबई शेअर बाजार खुला झाल्यानंतर ४७५.४५ अंशांनी वधारून ३१,८६५.५२ वर निर्देशांक पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १६३ अंशांनी वधारून ९,३६०.४० वर पोहोचला. मागील सत्रात मुंबई शेअर बाजारात २,७१३.४१ अंशांनी पडझड होवून निर्देशांक ३१,३९०.०७ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ७५७.८० अंशांनी घसरून ९,१९७.४० वर स्थिरावला होता.