मुंबई- सप्ताहाच्या प्रारंभी शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ५०० अंशांनी वधारला आहे. २००८ मधील मंदीच्या काळात झालेल्या नुकसानाहून शेअर बाजाराचे गेल्या आठवडभरात जास्त नुकसान झाले आहे.
मुंबई शेअर बाजार खुला होताना ७५० अंशांनी वधारला होता. त्यानंतर सकाळी सुमारे १० वाजता शेअर बाजार निर्देशांक ५०२.१६ अंशांनी वधारला. तर निफ्टीचा निर्देशांक १८५.९५ अंशांनी वधारून ११,३८७.७० वर पोहोचला. मुंबई शेअर बाजारात सर्वाधिक आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत.
खनिज तेलाचे दर प्रति बॅरल ३.५ टक्क्यांनी वधारून ५१.४४ डॉलरवर पोहोचले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी १,४२८.७४ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदारांनी ७,६२१.१६ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. शुक्रवारी मुंबई शेअर बाजार निर्देशांकात १,४४८ अंशांनी घसरण झाली होती.