महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजारात 1184 अंशांची तेजी; 'या' कंपन्यांचे वधारले शेअर - Bombay share market live news

मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक 800 अंशांनी वधरून 33,217.44 वर पोहोचला होता. तर निफ्टी 230.15 वधारून 9,810.45 वर पोहोचला होता.

Share market
शेअर मार्केट

By

Published : Jun 1, 2020, 2:49 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक 1184.14 अंशांनी उसळून 33,608.24 वर पोहोचला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक 333.45 अंशांनी वधारून 9,913.75 पोहोचला आहे.

मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक 800 अंशांनी वधरून 33,217.44 वर पोहोचला होता. तर निफ्टी 230.15 वधारून 9,810.45 वर पोहोचला होता. बजाज फायनान्सचे शेअर सर्वाधिक 11.05 टक्क्यांनी वधारले. बजाज फायनान्स सर्विसचे 9.17‌ टक्के, टाटा स्टीलचे 7 टक्क्यांनी वधारले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीचे नियम शिथील होत आहेत. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व व्यवसाय सुरू होत असल्याने गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीत उत्साह दाखविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details