महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक ७४ अंशाने वधारला; खासगी बँकेसह वित्तीय कंपन्यांचे शेअर तेजीत - Share Market news

आयसीआयसीआय बँकेचे शेअर हे सर्वाधिक ०.८८ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ एम अँड एम, आयटीसी, बजाज फायनान्स, टीसीएस, टाटा स्टील, एनटीपीसी, एल अँड टी आणि एचडीएफसीचे शेअर वधारले आहेत.

Mumbai Share Market
शेअर बाजार

By

Published : Dec 11, 2019, 12:05 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ७४ अंशाने वधारला. खासगी बँक, वित्तीय कंपन्या आणि धातुंचे वधारलेले शेअर वधारले. तर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घसरले. या कारणाने शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक ७४.०४ अंशाने वधारून ४०,३१३.९२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ०.२५ अंशाने वधारून ११,८८६.३० वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले-

आयसीआयसीआय बँकेचे शेअर हे सर्वाधिक ०.८८ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ एम अँड एम, आयटीसी, बजाज फायनान्स, टीसीएस, टाटा स्टील, एनटीपीसी, एल अँड टी आणि एचडीएफसीचे शेअर वधारले आहेत. येस बँकेचे शेअर हे ४.४५ टक्क्यांनी घसरले. चक एसबीआय, एचयूएल, पॉवरग्रीड, रिलायन्स, भारती एअरटेल, वेदांत आणि हिरोमोटोकॉर्पचे शेअर ०.९४ टक्क्यांनी घसरले.

हेही वाचा- देशाचा पहिला कॉर्पोरेट बाँड १२ डिसेंबरला होणार लाँच

मागील सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक २४७.५५ अंशाने घसरून ४०,२३९.८८ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक हा ८०.७० अंशाने घसरून ११,८५६.८० वर स्थिरावला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारात ३६६.७९ कोटींच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ३३८.४० कोटींच्या शेअरची खरेदी केली होती.

हेही वाचा-निर्गुंतवणूक ही फायदा अथवा तोट्यावर ठरत नाही - केंद्र सरकार

ABOUT THE AUTHOR

...view details