मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ३३६ अंशाने वधारून ३९,०६७ वर बंद झाला. टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिक बँक, टीसीएस आणि स्टेट बँकेचे शेअर सर्वात अधिक वधारले होते.
शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३३६ अंशाची वाढ; निफ्टीने ओलांडला ११,७५० चा टप्पा - Mumbai Share Market
तेलइंधनाचे दर वाढण्याची शक्यता असतानाही हे दर स्थिर राहिले आहेत

निफ्टी ५० चा निर्देशांक हा ११३ अंशाने वधारल्याने निफ्टीने ११,७५५ चा टप्पा ओलांडला.
तेलइंधनाचे दर स्थिरतेकडे -
तेलइंधनाचे दर वाढण्याची शक्यता असतानाही हे दर स्थिर राहिले आहेत. अमेरिकेने इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादल्याने ओपेक संघटनेने तेल उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेते कच्च्या तेलाच्या बॅरलचा दर प्रति बॅरल हा ७३.२७ डॉलर आहे. तर गुरुवारी प्रति बॅरलचा दर हा ७५ डॉलर प्रति बॅरल एवढा होता. हा चालू वर्षातील सर्वात अधिक दर होता.
अॅक्सिस बँकेने तिमाही आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील शेअरचे भाव वधारले आहेत.