मुंबई - शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. बँकिंगसह वित्तीय कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने ही घसरण झाली आहे. शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ३६१.९२ अंशाने घसरून ३८,३०५.४१ वर पोहोचला.
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी पडझड; बँकेसह वित्तीय कंपन्यांच्या शेअरची आपटी - मराठी बिझनेस न्यूज
शेअर बाजारात दुपारनंतर बँकांचे शेअर घसरण्यास सुरुवात झाली. दिवसभरात ७०० अंशाने शेअर बाजार घसरला होता. त्यानंतर बाजार काहीसा सावरल्याचे दिसून आले. निफ्टीचा निर्देशांक ११५ अंशाने घसरून ११,३५९.९० वर पोहोचला.

येस बँकेच्या शेअरची सर्वात अधिक २२ टक्क्यांनी घसरण झाली. या घसरणीनंतर येस बँकेच्या प्रति शेअरची किंमत २२ रुपये झाली आहे. इंडुसइंड बँकेच्या शेअरची ५.५ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाची शेअरची ४.९८ टक्के, भारती एअरटेलच्या शेअरची ४.५२ टक्के तर ओएनजीसीच्या शेअरची २.७२ टक्के घसरण झाली आहे.