मुंबई - सकाळच्या सत्रात सकारात्मक सुरुवात होऊनही बंद होताना शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ९५ अंशाने घसरुन ३७,४६२ वर बंद झाला. तर निफ्टीच्या निर्देशांकात २२.९० अंशाची घसरण होऊन ११,२७८ वर बंद झाला.
शेअर बाजारातील पडझडीचे सत्र सुरुच; निर्देशांकात ९५ अंशाची घसरण - trade war
अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवरील आयात शुल्क १० ते २५ टक्के वाढविण्याचा आज निर्णय घेतला आहे. महाशक्ती असलेल्या दोन देशांतील व्यापारी युद्धामुळे जगभरातील गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.
मुंबई शेअर बाजार
स्टेट बँक ऑफ इंडियाला चौथ्या तिमाहीत ८८३ कोटींचा नफा झाला आहे. यानंतर एसबीआयच्या शेअरमध्ये २.९४ टक्के वाढ झाली. भारती एअरटेल व आयसीआयसीआयचे शेअरही वधारले. अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवरील आयात शुल्क १० ते २५ टक्के वाढविण्याचा आज निर्णय घेतला आहे. महाशक्ती असलेल्या दोन देशांतील व्यापारी युद्धामुळे जगभरातील गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या आयात शुल्काच्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून चीनदेखील आयात शुल्क वाढविण्याची शक्यता आहे.