महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांकात दिवसाखेर ८७ अंशाने घसरण

कोरोनाबाधितांचे देशात प्रमाण वाढत असल्याने शेअर बाजारावर नकारात्मक पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी टाळेबंदी लागू केल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतीकार विनोद मोदी यांनी सांगितले.

share market news
शेअर बाजार

By

Published : Mar 22, 2021, 4:55 PM IST

मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ८७ अंशाने घसरला आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरमध्ये घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.

शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ८६.९५ अंशाने घसरून ४९,७७१.२९ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर ७.६० अंशाने घसरून १४,७३६.४० वर स्थिरावला.

हेही वाचा-गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-

इंडसइंड बँकेचे सर्वाधिक सुमारे ४ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. तर पॉवरग्रीड, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे टेक महिंद्रा, टीसीएस, सन फार्मा, इन्फोसिस आणि एचसीएल टेकचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-परमबीर सिंग यांचा गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न - नवाब मलिक

कोरोनाबाधितांचे देशात प्रमाण वाढत असल्याने शेअर बाजारावर नकारात्मक पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी टाळेबंदी लागू केल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतीकार विनोद मोदी यांनी सांगितले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.२० टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६४.४० डॉलर आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details