मुंबई- शेअर बाजार निर्देशांक ७२ अंशाने घसरून ४०,२८४.१९ वर स्थिरावला. जागतिक अर्थव्यवस्था मंदावत असल्याने एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसचे शेअर घसरले. याचा परिणाम झाल्याने मुंबई शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली.
मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीतही घसरण झाली. निफ्टीचा निर्देशांकही १०.९५ अंशाने घसरून ११,८८४.५० वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
शेअर घसरणीत सर्वाधिक येस बँकेचे ४.०८ टक्क्यापर्यंत नुकसान झाले. बजाज ऑटो, एम अँड एम, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, ओएनजीसी आणि टीसीएसचे शेअर २.०५ टक्क्यापर्यंत घसरले. तर भारती एअरटेल, टाटा स्टील, सन फार्मा, पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एसबीाय, वेदांत आणि टाटा मोटर्सचे शेअर हे ४.६० टक्क्यापर्यंत घसरले.