महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक ७०.२१ अंशाने वधारून बंद; गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा - BSE on 15th November 2019

शेअर ८.४२ टक्क्यांनी वधारून सर्वात अधिक भारती एअरटलेचा फायदा झाला.  शेअर बाजार ७०.२१ अंशाने वधारून ४०,३५६.६९ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक २३.३५ अंशाने वधारून ११,८९५ वर स्थिरावला.

संग्रहित - शेअर बाजार

By

Published : Nov 15, 2019, 6:13 PM IST

मुंबई- शेअर बाजार निर्देशांक ७०.२१ अंशाने वधारून बंद झाला. जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक स्थितीने भारती एअरटेल आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर वधारले. अर्थव्यवस्था मंदावल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले.

शेअर बाजार ७०.२१ अंशाने वधारून ४०,३५६.६९ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक २३.३५ अंशाने वधारून ११,८९५ वर स्थिरावला.

हेही वाचा-रेल्वे बोर्डाने वाढविले जेवणाचे दर; 'या' आहेत नव्या किमती

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले

एसबीआय, कोटक बँक, सन फार्मा, टाटा मोटर्स, एम अँड एम आणि टाटा स्टीलचे शेअर हे ५.१९ टक्क्यापर्यंत वधारले. तर हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, मारुती, आयटीसी, वेदांत, एनटीपीसी आणि टेक महिंद्राचे शेअर हे १.८५ टक्क्यापर्यंत घसरले.

हेही वाचा-मैलाचा दगड : एचडीएफसीने ओलांडला 7 लाख कोटींच्या भांडवली मूल्याचा टप्पा

शेअर ८.४२ टक्क्यांनी वधारून सर्वात अधिक भारती एअरटलेचा फायदा झाला. सर्वोच्च न्यायलायच्या आदेशानंतर भारती एअरटेलला दूरसंचार विभागाला थकित रक्कम द्यावी लागणार आहे. त्यासाठी भारती एअरटेलने २८ हजार ४५० कोटींची तरतूद केली आहे. त्याचा परिणाम म्हणून भारती एअरटेलने सप्टेंबरच्या तिमाहीत २३ हजार ४५ कोटींचा तोटा नोंदविला आहे. तरीही आव्हानात्मक वातावरणात कंपनीचे चांगली कामगिरी केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details