मुंबई - जपानमधील ओसाका येथे जी-२० परिषद पार पडत आहे. भारत-अमेरिकेमधील व्यापारी संबंधात तणाव असताना या परिषदेतील हालचालींकडे गुंतवणुकदारांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजार निर्देशांकात १९२ अंशाने घसरण झाली आहे.
शेअर बाजार निर्देशांक १९२ अंशाने घसरला, निफ्टीचा निर्देशांक ११,८०० हून खाली - Mumbai Share market
सेबीने म्युच्युअल फंडासाठीचे नियम कठोर केले आहेत. त्याचाही शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून आला.
शेअर बाजाराच्या निर्देशांकात १९२ अंशाची घसरण होवून ३९,३९४.६४ वर पोहोचला. निफ्टीच्या निर्देशांकात ५२.७० अंशाने घसरून ११,७८८.८५ वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
येस बँक, इंडुसइंड बँक, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, बजाज ऑटो, वेदांत, टाटा स्टील, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसी बँकेचे शेअर ३.२९ टक्क्यापर्यंत घसरले. बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, मारुती, एचयूएल आणि टेक महिंद्राचे शेअर १.०५ टक्क्यापर्यंत वाढले आहेत. सेबीने म्युच्युअल फंडासाठीचे नियम कठोर केले आहेत. त्याचाही शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून आला.