महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ऑटोसह आयटी कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री; निर्देशांक १८४ अंशाने घसरून ४०,०८३ वर बाजार बंद - Auto shares

शेअर बाजार व निफ्टीत शेअर खरेदी करताना गुंतवणूकदारांनी सकाळच्या सत्रात सावधगिरीची भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. त्यानंतर ऑटो आणि आयटी कंपन्यांचे शेअर नफा कमिवण्याच्या दबावातून अधिक प्रमाणात विकले गेले. आरबीआयकडून गुरुवारी रेपो दरात कपात होणार असल्याने गेल्या काही दिवसांत आयटी आणि ऑटो कंपन्यांचे शेअर वाढले आहेत.

शेअर बाजार

By

Published : Jun 4, 2019, 6:48 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक १८४ अंशाने घसरून ४०,०८३.५४ वर बंद झाला. निफ्टीच्या निर्देशांकात ६६.९० अंशाची घसरण होऊन १२,०२१.६५ वर पोहोचला.

शेअर बाजार व निफ्टीत शेअर खरेदी करताना गुंतवणूकदारांनी सकाळच्या सत्रात सावधगिरीची भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. त्यानंतर ऑटो आणि आयटी कंपन्यांचे शेअर नफा कमिवण्याच्या दबावातून अधिक प्रमाणात विकले गेले. आरबीआयकडून गुरुवारी रेपो दरात कपात होणार असल्याने गेल्या काही दिवसांत आयटी आणि ऑटो कंपन्यांचे शेअर वाढले आहेत. सकाळच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक १५२ अंशाने घसरून ४०,११७.८५ वर पोहोचला. तर निफ्टीच्या निर्देशांकात ५३.९० अंशाची घसरण होवून १२,०३३.४५ वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर वधारले-उतरले-

हिरो मोटोकॉर्प, एचसीएल टेक, टीसीएस, एशियन पेंट्स, इंडुसलँड बँक आणि इन्फोसिसचे शेअर ३.०८ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. तर येस बँक, एनटीपीसी आणि अॅक्सिस बँकेचे शेअर हे २.७१ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या ६५ वर्षात दुसऱ्यांता सर्वात कमी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याचा अहवाल समोर आला आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details