मुंबई - धातू आणि बँकिंगमधील तेजीमुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक १६९ अंशाने वधारला. गेल्या पाच सत्रात नुकसान झाल्यानंतर येस बँकेचे शेअर आज ६ टक्क्यांनी वधारले.
वित्तीय अनियमिततेमुळे इन्फोसिसची अमेरिकेत कायदेशीर चौकशी होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून इन्फोसिसचे शेअर हे २.६३ टक्क्यांनी घसरले. इन्फोसिसच्या प्रति शेअरची ७०१ रुपये किंमत झाली आहे. शेअर बाजार निर्देशांक १६९.१४ अंशाने वधारून ४०,५८१.७१ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ६१.६५ अंशाने वधारून ११,९७१.८० वर पोहोचला.