मुंबई- शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात १५० अंशाने घसरला आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी काढून घेतलेला निधी आणि बँकिंगच्या शेअरची मोठ्या प्रमाणात होणारी विक्री या कारणांनी शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली.
शेअर बाजार निर्देशांक १७०.९८ अंशाने घसरून ३८,००६.९७ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ४८.६० अंशाने घसरून ११,२६४.७० वर पोहोचला. गेली काही दिवस बँकिंगच्या शेअरमध्ये घसरण होत आहे.
हेही वाचा-जिओच्या ग्राहकांना पहिल्यांदाच कॉलिंगकरिता मोजावे लागणार पैसे; 'हा' आहे नवा दर
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एसबीआय, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, येस बँक, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, एचडीएफसी ट्विन्स, एम अँड एम, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँकेचे शेअर २.६६ टक्क्यापर्यंत घसरले. तर भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस आणि सन फार्माचे शेअर ५ टक्क्यांनी वधारले आहेत.
हेही वाचा-कांदे दरवाढीनंतर ग्राहकांना पुन्हा महागाईची झळ; दिल्लीत टोमॅटोचा दर प्रति किलो ८० रुपये!
मागील सत्रात शेअर बाजार निर्देशांक ६४५.९७ अंशाने वधारून ३८,१७७.९५ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक हा ११,३१३.३० वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआयएस) भांडवली बाजारामधून ४८५.२४ कोटी रुपये बुधवारी काढून घेतले. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ९५६.२६ कोटींच्या शेअरची खरेदी केली आहे. रुपया सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलने ५ पैशांनी वधारून ७१.०२ झाला. तर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ०.१७ टक्के घसरून ५८.२२ डॉलरवर पोहोचला आहे.
हेही वाचा-देशांतर्गत विमान प्रवासावर 'विस्तारा'कडून ऑफर; ४८ तासात करावी लागणार बुकिंग