मुंबई- सलग पाचव्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. कोरोना विषाणुने जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती आहे. यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक १४३ अंशांनी घसरला आहे.
डेरिव्ह कान्ट्रॅक्टची मुदत संपत असल्याने शेअर बाजार अस्थिर झाल्याचे ट्रेडरने सांगितले. मुंबई शेअर बाजार निर्देशांक १४३.३० अंशांनी घसरून ३९,७४५.६६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ४५.२० अंशांनी घसरून ११,६३३.३० वर स्थिरावला होता.
हेही वाचा- २ हजार रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण कमी; केंद्रीय अर्थमंत्री म्हणतात...
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
ओएनजीसीचे सर्वाधिक शेअर घसरले आहेत. एचसीएल टेक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प आणि एम अँड एमचे शेअर घसरले आहेत. सन फार्मा, टायटन, एशियन पेंट्स आणि अॅक्सिस बँकेचे शेअर वधारले आहेत.
देशातील उत्पादक चीनमधील कच्च्या मालावर आणि इतर वस्तुंच्या आयातीवर अवलंबून आहेत. त्यामुळे कोरोनाने भारतावर मोठा आर्थिक परिणाम होण्याची भीती आहे. राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या विकासदराची आकडेवारी सरकार शुक्रवारी प्रसिद्ध करणार आहे.
हेही वाचा-कोरोनाने उत्पन्नावर होणार परिणाम; अॅपलपाठोपाठ मायक्रोसॉफ्टची कबुली