मुंबई- शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. शेअर बाजाराने गुरुवारी तेजी अनुभवली होती. गुंतवणूकदार आज शेअर विक्री करून नफा नोंदवित असल्याचे दिसत आहे.
बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरवर विक्रीचा दबाव आहे. सकाळच्या सत्रात सकाळी दहा वाजून दहा मिनिटाला मुंबई शेअर बाजार निर्देशांक २३५.४४ अंशाने घसरून ४३,३५८.२३ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ६०.३० अंशाने घसरून १२,६८८.८५ वर पोहोचला. दीनदयाळ इनव्हेस्टमेंट्सचे तांत्रिक विश्लेषक मनिष हाथिरमानी म्हणाले, की निफ्टीने विसावा घेतल्याचे दिसत आहे. ट्रेण्ड कायम राहण्यासाठी हे नैसर्गिक आहे. निफ्टीच्या निर्देशांकाचे सुमारे १३,००० अंश हे उद्दिष्ट असायला हवे. त्यामुळे संपूर्ण शेअर बाजाराला फायदा मिळू शकतो. आपल्याला १२,००० अंशापर्यंत आधार मिळाला आहे. त्यामुळे आपण आणखी उद्दिष्ट ठेवू शकतो.